डोंबिवली: ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्टेशन दरम्यान एक इसम एसी लोकलवर दगड फेक करत असल्याची घटना गुरुवारी सकाळी सव्वा नउ वाजेदरम्यान घडली, त्यात एका लोकलच्या खिडकीची काच फुटली असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित इसमास ताब्यात घेण्यात आले असून कौटुंबिक कलहामुळे नैराश्य आल्याने त्याने असे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले.
त्याबाबतची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस, आरपीएफ जवान घटनास्थळी गेले, त्यांनी तेथून लोकल गाड्यांवर दगडफेक करणाऱ्या शरद महादेवराव गांगुर्डे वय ३८ वर्ष पिंपरखेड ता. चाळीसगांव जि.जळगांव यास अटक केली. त्या घटनेची माहीत मिळताच त्या ठिकाणी आरपीएफ जवानांनी त्यास ताब्यात घेतले असता तो रेल्वे लोकल गाड्या वर दगड फेकतानाही दिसून आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्या इसमा विरुद्ध रेल्वे सुरक्षा बल डोंबिवली येथे रेल्वे ऍक्ट अन्वेय गुन्हा नोंद करण्यात आहे. पुढील तपास रेल्वे सुरक्षा बल करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.