कल्याण-भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली.यावेळी ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्यासह उप अभियंता उमेश भट, भाजपचे माजी नगरसेवक मनाेज राय, पदाधिकारी सत्यप्रकाश उपाध्याय, नितीन तरे, वंदना मोरे, मनोज माळी, यशोदा माळी, मोना शेठ, लल्लन कनोजिया आदी उपस्थित होते.
नालेसफाईच्या कामाकरीता महापालिकेने साडे तीन कोटीचे टेंडर काढले आहे. ९५ मोठ्या नाल्यातील गाळ जेसीबी आणि पोकलेन द्वारे कंत्राटदार काढणार आहे. कामाला सुरुवात झाली आहे. नालेसफाई योग्य प्रकारे केली जात नसल्याची बाब समोर आल्याने पावसाळ्यात नागरीकांच्या घरात पाणी शिरू शकते. ही बाब लक्षात घेता सुलभा गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील नाल्यांची पाहणी केली.
कंत्राटदाराने केवळ फ्लोटींग मटेरियल काढून कामाचा दिखावा केला आहे, सर्व गाळ नीट काढण्यात आलेला नाही. ही बाब सुलभा गायकवाड यांनी अधिकारी वर्गासह कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून दिले.