डोंबिवली : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम अत्यंत वेगाने सुरू असून २४ जानेवारी २४ रोजी अयोध्येला राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होईल आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. आहेत.आमची तळमळ ही आहे की लवकर भगवंतांनी त्यांच्या स्थानी विराजमान व्हावे असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या कोषाध्यक्ष प.पू.स्वामी श्री. गोविंददेव गीरीजी महाराज यांनी बुधवारी डोंबिवलीत माध्यमांना सांगितले.
डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्यावेळी एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ.मिलिंद शिरोडकर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, मधुकर चक्रदेव, आरबीआय संचालक सतीश मराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंदिरात मुख्य गाभारा,पहिला मजला आणि दर्शनाची व्यवस्था इतकं सगळं होईल आणि भगवंताचे नवीन भव्यदिव्य मंदिरात आगमन होईल.भगवान राम लल्ला ना त्यांच्या मुळ स्थानी विराजमान करावं हे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला हवे आहे.
कारण भगवान राम लल्ला यांनी पुष्कळ दिवस कपड्यांच्या मंडपात काढले आता तात्पुरत्या छोट्या श्या मंदिरात श्रीराम आहेत. डोंबिवलीत मी यावं आणि एम्स हॉस्पिटलच्या नूतन वास्तूचे लोकार्पण कार्य, तसेच श्री गणपतीच्या उपक्रमात सहभागी व्हावे असा मला आग्रह होता. योगायोगाने दोन ते तीन कार्यक्रम असल्याने येथे मला येण सुकर झाले. अयोध्येच्या राम मंदिराच्या कार्यामुळे मला फार कमी वेळ मिळतो म्हणून मला तीनही कार्यक्रम एकत्र असल्याने डोंबिवली त येत शक्य झाल्याचे ते म्हणाले. त्यावेळी झालेल्या सभास्थानी माजी नगरसेवक राजन मराठे, ज्योती मराठे, राहुल दामले, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते. विनय भोळे यांनी निवेदन केले तर सुत्रसंचालन अनिकेत घमंडी यांनी केले.