कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेने निवडणूकीसाठी पॅनल पद्धतीने 133 प्रभागांची रचना प्रसिद्ध केली. यामध्ये डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव असलेल्या प्रभागाचेच नाव बदलण्यात आहे. प्रभागास पुन्हा सावरकरांचेच नाव देण्यात यावे यासाठी भाजपच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे 333 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
प्रभागाचे नाव सावरकर होते. ते जाणीवपूर्वक बदलण्यात आले आहे. शिवसेनेने त्यांच्या सोयीनुसार प्रभाग रचना केली आहे. यावरुन भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल होते. हीच टिका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर केली होती. त्या पाठोपाठ भाजपने ही केली. यावरुन राजकारण तापले होते. सावरकरांचे नाव प्रभागाला देण्याच्या मागणीसाठी भाजपने डोंबिवलीत मोर्चाही काढला होता. त्यासाठी भाजपने एक मोहिम छेडली. ज्या नागरीकांना हरकती नोंदवायच्या आहेत. त्यांनी त्या प्रथम भाजप कार्यालयात जमा कराव्यात.
भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देत 333 नागरीकांनी प्रभागाचे नाव पूर्वी प्रमाणो स्वातंत्र्य वीर सावरकर असावे अशी मागणी केली. या नागरीकांच्या हरकती घेऊन आज भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे महापालिका मुख्यालयात पोहचले. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थीत होते. 333 जणांच्या हरकती त्यांनी महापालिका प्रशासनाकडे दाखल केल्या आहेत.
आव्हाडांनी रोज यावे कल्याण डोंबिवलीत-
आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गृह निर्माण मंत्री आव्हाड यांनी कल्याण डोंबिवलीत विकास हरवला आहे. विकास फक्त भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांच्याच घरी झाल्याची टिका केली. त्यावर आमदार चव्हाण यांनी निवडणूकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीत येऊ जाऊ लागले आहे. त्यांनी कल्याण डोंबिवलीत रोज यावे. आणि काही तरी बोलावे असा टोला आव्हाड यांना लगावला आहे.