शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

‘त्या’ वाहनांवर कारवाईकरा, अन्यथा उग्र आंदोलन, मनविसेचा आरटीओला इशारा

By प्रशांत माने | Published: October 03, 2022 4:33 PM

Kalyan News: काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला आहे.

- प्रशांत माने कल्याण - काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला असून जे बेकादेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यावतीने आरटीओला निवेदनाद्वारे दिला आहे.

कल्याण आरटीओ परिक्षेत्राअंतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर ही शहरे येतात. पनवेल-खारघरमध्ये शॉर्टसर्कीटमुळे धावत्या स्कूलबसला आग लागल्याच्या १२ सप्टेंबरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमतने कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थी वाहतूकीचा आढावा घेता आरटीओच्या नियमांचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली होती. यावर ‘स्कूल व्हॅन, रिक्षामध्ये मेंढरासारखे भरतात विद्यार्थी’ या मथळयाखाली लोकमतमध्ये १४ सप्टेंबरला बातमी प्रसिध्द केली होती.

दरम्यान सात दिवसांपूर्वी अंबरनातमध्ये घडलेल्या घटनेमुळे वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान याबाबत महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्र घेतला आहे. सोमवारी मनविसेच्या शिष्टमंडळाने कल्याण आरटीओचे अधिकारी विनोद साळवी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. आरटीओ परिक्षेत्रातील सर्वच खाजगी तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नियोजन करणा-या वाहनांची तसेच स्कूलबसची तपासणी करावी, बेकादेशीरपणे वाहतूक करणा-या आणि विद्यार्थ्यांच्या जीविताबरोबर खेळणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनविसेचे कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिला. यावर कल्याण आरटीओकडून कारवाई सुरू असून एप्रिल पासून ते आजपर्यंत सुमारे १२० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सातत्याने सुरू असल्याचे साळवी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याण