डोंबिवली: टाटा म्हणजे उद्योगातील एकवचनी राम आहे. टाटा जे करतात ते देशाचा विचार करूनच करतात" असे यांनी प्रतिपादन डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. टाटा समूहाच्या दीड शतकाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लेखक माधव जोशी लिखित 'टाटा एक विश्वास' या मोरया प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन निरगुडकर, श्रीकांत बोजेवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे हस्ते शनिवारी श्री गणेश मंदिरात संपन्न झाले, त्यावेळी निरगुडकर बोलत होते.
प्रकाशक दिलीप महाजन आणि डोंबिवलीतील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या दिमाखदार सोहळ्यास उपस्थित होते. माधव जोशी यांच्या बावीस वर्षांच्या टाटा समूहातील सेवेमुळे आणि रतन टाटा यांचेबरोबर जवळून काम करण्याच्या अनुभवामुळे हे पुस्तक आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांपेक्षा कसे वेगळे आहे हे वक्त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. जोशी यांचे 'माझी कॉर्पोरेट दिंडी ' हे ग्रंथाली प्रकाशित पुस्तक गेले वर्षभर गाजते आहे आणि त्याच्या तीन आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत.