कल्याण-जगातील सर्वात उंच इमारत असलेलया बुर्ज खलिफा येथे अनोख्या पद्धतीने शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
दुर्गराज रायगडा पासून ते जगातील काना कोपऱ्यात यंदाचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा बुर्ज खलिफा दुबई येथे देखील दुबईतील शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. दुबईत मराठी बांधवांसाठी शिवजयंती सारखे भव्य सामाजिक कार्य करणारे चंद्रशेखर जाधव आणि त्यांच्या सहकारी परिवारा सोबत साजरा केला. या सहकाऱ्यांनी दुबई येथे शिवराज्याभिषेक सोहळा आयोजीत केला. या शुभ प्रसंगी टूर्स आणि ट्रॅव्हल्सची नवीन संस्था स्थापन करून त्याचे अनावरण आजच्या शिवराज्याभिषेक दिना निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन करून नवीन संस्थाचे डॉक्युमेंट्स छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केले.
या सहकाऱ्यांनमधे चंद्रशेखर जाधव यांच्या सोबत संदीप शिंपी, संदीप पवार, प्रशांत शिंपी आणि त्यांचा परिवार सामील झाला. दूर देशी राहून देखील शिवरायांची शिकवण व प्रेरणा देणारा आणि शिवभक्ती जपणारा असा अनोखा सोहळा उत्साहात साजरा झाला. या सोबतच दुबई येथे १८ जून २०२३रोजी छत्रपती मराठा साम्राज्य यांच्या तर्फे यंदा मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजीत करण्यात येणार आहे. दुबईतील सर्व शिवभक्तांना या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मोफत आनंद घेता येणार आहे असे जाधव यांनी सांगितले. शिवभक्त जाधव हे मूळचे डोंबिवलीकर ते व्यावसायानिमित्त दूबईत आहे.