कल्याण : करोनाच्या लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे म्हाडाने बांधलेल्या परवडणाऱ्या घरांचा ताबा देण्यास उशिरझाल्याने कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण येथील लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. या लाभार्थ्यांचा शेवटचा १० टक्क्यांचा हफ्ता माफ करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. या मागणीला या पूर्वीतत्वतः मंजुरी देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत या ठरावाला मान्यता देण्यात आली असून यानिर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे लाभार्थांचे सुमारे ३२ कोटी रूपये वाचणार असून त्यांना दिलासामिळाला आहे.
म्हाडाने घरांसाठीची २०१८ साली सोडत काढण्यात आली होती. २०२१ पर्यंत विजेत्यांना घराचा ताबा देणे अपेक्षितहोते. मात्र या दरम्यान आलेला करोनामुळे ताबा देण्यास विलंब झाला. त्याचवेळी या घरांच्या कर्जापोटी लाभार्थ्यांना बँकांचे हफ्ते भरावे लागत होते. एकीकडे ताबा न मिळालेल्या घरांचा हफ्ता तर दुसरीकडे ज्या घरात भाड्याने राहतो त्या घराचे भाडे अशा दुहेरी आर्थिक कोंडीमध्ये लाभार्थी अडकले होते. लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घराचा शेवटचा हफ्ता माफ करण्यात यावा अशी मागणी कल्याण लोकसभा खासदार शिंदे यांनी म्हाडाकडे केली.
म्हाडा समवेत अनेक वेळा बैठका घेत पत्रव्यवहार केला. खासदारांच्या मागणीची दखल घेत म्हाडाने घराचा शेवटचा हफ्ता माफ केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या म्हाडाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे २ हजार लाभार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे म्हाडाने हा महत्वाचा निर्णय घेतला. म्हाडा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे खोणी आणि शिरढोन प्रकल्पातील प्रत्येक विजेत्याचे १ लाख ६३ हजार रुपयांनुसार लाभार्थ्यांचे ३२ कोटी ६२ लाख रुपये वाचले आहेत.
याआधी कल्याण डोंबिवलीतील बीएसयीपी घरांची महापालिकेचा आणि लाभार्थ्यांची ५६० कोटी रुपय रक्कम माफ करण्यात आली होती. त्यानंतर आता म्हाडाच्या लाभार्थ्यांचे पैसे माफ केल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले जात आहे.