कल्याण-परदेशातून रेल्वेने प्रवास करीत असताना महात्मा गांधी यांना गोऱ््या अधिकाऱ््याने गाडीतून बाहेर ढकलून दिले. उच्च शिक्षित असलेल्या गांधी यांचा झालेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. ही स्थिती त्यांची असेल तर आपल्या मायदेशात काय स्थिती असेल याची कल्पना त्यांना आली. त्यानंतर त्यांनी देश सेवेला वाहून घेतले. त्यांच्या जीवनात घडलेली ही घटना हीच गांधी पर्वाची सुरुवात होती असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी येथे केले.
हिंदी भाषी जनकल्याण शिक्ष संस्था संचलित के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या वतीने आज गांधी पर्व या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार पवार यांनी उपरोक्त उद्गार काढले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे पदाधिकारी डा’. आर. बी. सिंग, ओमप्रकाश पांडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, संदीप देसाई, प्राचार्या अनिता मन्ना आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार पवार यांनी सांगितले की, आपल्या जीवनात गांधीचे विचार हे आपल्यासाठी रोल मॉडेल असले पाहिजे. एखादा महाविद्यालयातील शिपाई हा त्याच्या मुलाला उच्च शिक्षण देत असेल तर तो देखील तुमचा रोल मॉडेल असा पाहिजे याकडे उपस्थित तरुण वर्गाचे लक्ष वेधले.या प्रसंगी आमदार पवार यांच्या हस्ते कचरा वेचक वस्तीतील विद्यार्थी तसेच ब प्रभागातील सफाई कामगार यांना गांधी टाेपी, खादी वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.
जवान चित्रपटाचे कौतुकशाहरुख खान यांच्या जवान चित्रपटाचे आमदार पवार यांनी कौतुक केले. या चित्रपटांमध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांचे रियल इशू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद वापरत नाहीत तोपर्यंत चांगल्या विचारांचे लोक निवडून येणार नाहीत. हे या चित्रपटातून सांगण्यात आल्याचे पवार यांनी नमूद केले.