कल्याण-कल्याण शीळ रस्ते बाधितांच्या मोबदल्याचा प्रश्न आत्ता अंतिम टप्प्यात आला आहे. या संदर्भात चार दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कल्याण आणि ठाणे प्रांत अधिकारी यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती मोबदल्याची एकूण रक्कम येत्या आठवडयातच ठरणार आहे अशी महिती सर्व पक्षीय युवा मोर्चाचे प्रमुख संघटक गजानन पाटील यांनी दिली आहे.
भिवंडी-कल्याण-शीळ या रस्त्याचे या पूर्वी दुपरीकरण. त्यानंतर चाैपदरीकरण करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खाजगी ठेकेदाराच्या मार्फत सहा पदरी सिमेंट का’न्क्रीटीकरणाचा रस्ता तयार केला जात आहे. या रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झालेले आहे. हा रस्ता २१ किलोमीटर अंतराचा आहे. या रस्त्याचे पाच किलोमीटरचे काम बाकी आहे. या पाच किलोमीटरच्या अंतार रस्ते बाधितांच्या मोबदल्याचा प्रश्न रखडला होता. त्यामुळे हे काम थांबले होते. रस्ते बाधितांनी त्यांना मोबदला टीडीआर स्वरुपात न देता रोख रक्कमेच्या स्वरुपात समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर देण्यात यावा अशी जाेरदार मागणी केली होती. त्यासाठी ५० दिवसापेक्षा जास्त साखळी उपोषण काटई नाक्यावर केले होते.
या रस्ते प्रकल्पात १४ गावातील २०० पेक्षा जास्त जमीन मालकांची जागा बाधित होते. त्यांना रेडीरेकनरनुसार अडीच पटीने मोबदला आर्थिक स्वरुपात द्यावा. बाधितांच्या मोबदल्याची रक्कम जवळपास २०० कोटी रुपये होते असा प्राथमिक अंदाज युवा मोर्चाचे प्रमुख संघटक पाटील यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीनुसार मोबदल्याची रक्कम दर निश्चीी समितीकडून काढून ती राज्य रस्ते विकास महामंडळास कळविली जाईल. महामंडळाकडून मोबदल्याच्या रक्कमेकरीता प्रशासकीय मान्य राज्य सरकारकडून घेतली जाईल. त्यानंतर महामंडळाकडून ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयास वर्ग केली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ती बाधितांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल.दरम्यान विविध विकास कामांची पाहणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी केली होती. या वेळीत्यांनी सांगितले होते की, कल्याम शीळ रस्ते बाधितांच्या किती मोबदला द्यायचा या प्रश्न येत्या आठवड्यात मार्गी लागणार आहे. हा प्रश्न निकाली निघताच कल्याण शीळ रस्त्याचे पाच किलोमीटर अंतरातील रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे.