डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागात काँक्रिट रस्त्याला पडलेले तडे/भेगा याची माहिती प्रसार आणि समाज मध्यांमावर येताच जागे झालेले एमएमआरडीए प्रशासन आणि त्यांचे ठेकेदार यांनी तडे/भेगा पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती चालू केली आहे. सद्या हे दुरुस्तीचे काम ममता हॉस्पिटल रोडवर चालू करण्यात आले असून निवासी भागातील तडे पडलेल्या सर्व काँक्रिट रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे. त्यापूर्वी सदर रस्त्यांच्या ठेकेदाराचा सुपरवायझर एस. मनोरंजन व कर्मचाऱ्यांनी तक्रारदार रहिवाशांची प्रत्यक्ष संपर्क साधून तडे पडलेल्या रस्त्यांची माहिती घेतली होती. त्याबाबत सागर पाटील, राजु नलावडे, प्रवीण जाधव यांनी कुठे कुठे तडे, भेगा पडले आहेत याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठेकेदाराचा माणसांना दाखविण्यात आले होते.
काँक्रिट रस्त्याला पडलेले तडे-भेगा यांची दुरुस्ती सुरू झाली
By अनिकेत घमंडी | Published: February 06, 2024 4:53 PM