गेल्या ४ दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरात मान्सूनचे आगमन झाले.असून कल्याण डोंबिवलीत पावसाची संततधार सुरू आहे.या पावसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे पावसामुळे रस्त्यावरती खड्डे पडण्याची ही घटना वा घडत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दुर्गाडी किल्यासमोरील रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठं-मोठे खड्डे पडले आहे. याच खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याच बरोबर काही महिन्यांपूर्वी गोविंदवाडी पुलावरील रस्ता दुरुस्त करत करण्यात आला होता.
या रस्त्यावर देखील मोठे खड्डे पडले असून रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पहिल्याच पावसात केडीएमसी मधील रस्त्याची दुर्दक्षा समोर आली आहे. आता प्रशासन याकडे लक्ष देईल का कोणता अपघात होण्याची वाट पाहणार असा सवाल प्रवासी करू लागले आहेत.