शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी
By मुरलीधर भवार | Published: March 14, 2023 07:40 PM2023-03-14T19:40:45+5:302023-03-14T19:40:54+5:30
अंधारे यांनी कल्याणमधील डायरे कुटुंबियांची घेतली भेट.
कल्याण- शीतल म्हात्रे प्रकरणात एसआयटीची मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी नक्की करावी. दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे. बिल्कूल याची चौकशी झाली पाहिजे. एसआयटी नेमताना पुलीस भी तुम्हारी, लोक भी तुम्हारे, और जजमेंट भी तुम्हारा ये बात नही चलेगी.या प्रकरणात सन्मानीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणारी त्यांच्या सुपरव्हीजन खाली असणारी एसआयटी असली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषणा अंधारे यांनी केली आहे.
शीतल म्हात्रे व्हीडीओ व्हायरल प्रकरणी कल्याणमधील ठाकरे गटाच्या विनायक डायरे याला दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शिंदे गटाच्या तीन जणांनी डायरे यांच्या कुटुंबियांना धमकाविले. जीवे मारण्याची धमकी दिली. डायरे यांच्या कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी नावानिशी तक्रार नोंदविली नाही. डायरे कुटुंबीयांची आज शिवसेना नेत्या अंधारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. आम्ही चुकीच्या कृतीचे समर्थन करीत नाहीत. अशा एखाद्या घटनेचे निमित्त करुन जर तुम्ही आमच्या कार्यकत्र्याना नाहक त्रस दिला जात आहे. प्रकाश सुव्रे या प्रकरणात काहीच बोलत नाहीत. त्यांनी बोलणो फार अपेक्षित आहे.कारण त्यांची बहिण शीतल म्हात्रे या त्यांना भाऊ ा माणतात. भावाने बहिणीवर घाणोरडे आरोप होत असताना भावाने पुढे आले पाहिजे. बोलले पाहिजे. मात्र ते का बोलत नाही. याचा अर्थ कुठे तरी म्यूनिप्यूशन होत आहे का याचाही विचार केला पाहिजे.
या प्रकरणी तीन मागण्या अंधारे यांनी केल्या आहेत. प्रकाश सुव्रे यांच्या मुलाच्या अकाऊंटवरुन जे लाईव्ह झाले. ते डिलिट झाले. ते सायबरने रिकव्हर केले पाहिजे. व्हीडीओ मॉर्ब आहे तर व्हीडीओ दाखविलाच गेला पाहिजे. जर व्हीडीओ व्हायरल करणो गुन्हा नाही. व्हीडीआ े अपलोड करणारा त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याच वेळी डायरे कुटुंबियांना संरक्षण मिळाले पाहिजे. सत्ता तुमच्या हाती आहे तर काही करु शकत नाही. गृह मंत्र्यांनी साकल्याने विचार करावा. गृह मंत्री एका पक्षाचे नाहीत. तर महाराष्ट्राचे आहात.
शितल म्हात्रे यांना फॉलो केले जात आहे याविषयी अंधारे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,याचा अर्थ असा आहे की,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरत आहे. जर एवढय़ा मोठय़ा चर्चेत असणा:या व्यक्तीचा पाठलाग होत असेल तर गृह मंत्रलय सपशेल अपयशी ठरलेले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन त्यांच्याकडून गृहखाते काढून घेतले पाहिजे.