- मयुरी चव्हाण - काकडे
डोंबिवली - जग कितीही आधुनिकता आणि सोशल मिडीयाकडे वळलं तरी आजही कल्याण डोंबिवली शहरात आवर्जून नाट्यगृहात जाऊन नाटकं पाहणारे दर्दी रसिक आहेत. मराठी कलाकारांना नेहमीच कल्याण डोंबिवली शहराचं आकर्षण राहीलंय. अनेकदा सोशल मिडियावरून नाट्य कलाकारांनी या शहरातील नाट्यगृहांबद्दल नाराजी देखील व्यक्त केली. त्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची दोन्ही नाट्यगृह कात टाकू लागलीये..आता कलाकार प्रशांत दामले यांनी देखील एक महत्त्वाचं विधान केलंय...शहरातील दोन्ही नाट्यगृह इतकी वाईट नाही पण ती खूप छानही नाही असं विधान केलं आहे. हे विधान करत एकप्रकारे दोन्ही नाट्यगृहांमध्ये अजून सुधारणा व्हावी अस मतच अप्रत्यक्षपणे त्यांनी व्यक्त केलं आहे.
डोंबिवली स्टेशन परीसरात नाट्यगृहाच्या नवीन तिकीट घराचं उदघाटन प्रशांत दामले यांच्या हस्ते करण्यात आलं...यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधानं केलं.मुळात नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे. नाटक आणि नाट्यगृह हे लोकांसाठी आहे..नाट्यरसिकांना नाट्यगृहापर्यंत आणण्याची जबाबदारी आम्हा कलाकारांची आहे.पण नाटक संपल्यावर जेव्हा प्रेक्षक बाहेर पडतो त्यावेली नाट्यगृह चांगलं होत.एसी छान होता.स्वच्छतागृह चांगलं आहे..अशा गोष्टी होणं अपेक्षित आहे. अशा सर्व गोष्टींचा मेळ जेव्हा एकत्र होईल तेव्हा सुधारणा होऊ शकते अस दामले म्हणाले. कल्याण डोंबिवली महानागरपालिकेचं कल्याण मधील आचार्य अत्रे नाट्यगृह आणि डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे दोन्ही नाट्यगृह तितकी वाईट नाही पण तितकी छानही नाही...सुधारायला वाव असतो..जसा कलाकाराला सुधारणा करायला वाव असतो तस नाट्यगृहाचंही आहे असं सांगत त्यांनी एकप्रकारे सूचक वक्तव्य करत दोन्ही नाट्यगृहात आणखी सुधारणा होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली..यावेळी केडीएमसी आयुक्तांसह इतर अधिकारी देखील उपस्थित होते... मात्र नेमक्या काय सुधारणा पाहिजेत यावर थेट बोलणं त्यांनी टाळलं...याविषयावर केडीएमसीचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांच्याशी मी चर्चा करणार असून एकंदरीत नाट्यगृह इतर संबंधित विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिटिंग झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं...त्यामुळे दामले यांचा सल्ला पालिका प्रशासन किती मनावर घेतंय ते पाहावं लागेल.
यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे, अभिनेता प्रशांत दामले, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, प्रशांत भागवत , प्रभाग क्षेत्र अधिकारी दिनेश वाघचौरे इत्यादी उपस्थित होते.
नाटकांना सुगीचे दिवस यायला अजून वेळ.आहे..बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा उत्तम असत तेव्हा कलाकार प्रेक्षक आणि महानगरपालिका पण खुश असते अस मत दामले यांनी व्यक्त केलं. बाकी काही असलं तरी डोंबिवलीकर नाट्यरसिक खूप चोखंदळ आहेत. त्यांनी नाट्यमेजवाणीचा आनंद नक्की घ्यावा .ओटीटी प्लॅटफॉर्म आला तरी मराठी नाटकांचे प्रेक्षक काही कमी होणार नाही...टीव्ही आला तेव्हाही बोललं गेलं की आता नाटकाचं काय होणार? पण नाटकाला पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे हेसुद्धा विसरून चालणार नाही असेही प्रशांत दामले यांनी आवर्जून सांगीतलं.
डोंबिवली स्टेशन परीसरात तिकीट विक्री केंद्र होत..पण ते बंद झालं होतं...हे केंद्र पुन्हा सुरू व्हावं अशी मागणी नाट्यरसिकांमधून जोर धरू लागली होती..आचार्य अत्रे नाट्यगृहात नुतनीकरणाचं काम सुरू होणार असून कलाकारांना रंगीत तालीम करण्यासाठी एक हॉलही उपलब्ध करून दिला जाणार आहे...त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले नाट्यगृहात चांगल्या सुविधा आहेत त्या अजून चांगल्या कशा होतील यावर भर देऊ...येणाऱ्या दिवसात नाटकांना नक्कीच सुगीचे दिवस येतील..- डॉ भाऊसाहेब दांगडे, आयुक्त, केडीएमसी