शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

दुर्गम डोंगर रांगांत टॉवर उभारणीसाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर, मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाची प्रयत्नांची पराकाष्ठा 

By मुरलीधर भवार | Published: June 01, 2023 2:51 PM

महाराष्ट्रात अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा वापर करून प्रकल्प उभारणी करण्याची ही पहिलीच घटना असावी.

कल्याण - महाराष्ट्र राज्याच्या विजेचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यक ते सारे करण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे. म्हणूनच दुर्गम डोंगर रांगांच्यात उच्च वीज दाबाच्या वाहिन्या आणि टॉवर उभारणीसाठी कंपनी हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा वापर करून प्रकल्प उभारणी करण्याची ही पहिलीच घटना असावी. प्रकल्पासाठी अंबरनाथ तालुका ते पनवेल तालुका यांच्या दरम्यान असणाऱ्या डोंगर रांगांच्यात उच्च वीज दाब वाहून नेणाऱ्या वाहिन्या आणि टॉवर उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. साधारण पणे १४ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या या दुर्गम डोंगर रांगांच्यातून जाणार आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत टॉवर उभारणीचे काम करावे लागते.कितीही खडतर परिस्थिती असली तरीही प्रकल्प वेळेत पूर्ण झालाच पाहिजे या विजिगिषु वृत्तीने कंपनी अत्याधुनिक विकसन प्रणालीचा अवलंब करत आहे. 

या प्रकल्पाचे राष्ट्रीय महत्व ध्यानात घेता तो वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.म्हणूनच या साऱ्या पार्श्वभूमीवर स्टरलाईट पॉवर अंतर्गत मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प डोंगर प्रदेशातील कन्स्ट्रक्शन साईट वर अवजड साहित्य पोहोचविण्याच्या दृष्टीने हेलिकॉप्टर चा वापर करत आहे. हे हेलिकॉप्टर दिवसात साधारण पणे बेस वरून ५० ते ६० फेऱ्या मारत टॉवर उभारणीचे साहित्य प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन साईट वर पोहोचवत आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंग वाडी येथील हेलिबेस चे ऍव्हेशन हेड राहुल उनियाल यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी सांगितले कि या प्रकल्पाचे साठी वापरण्यात येणारे हेलिकॉप्टर हे उत्कृष्ट दर्जाचे असून ते चालविणाऱ्या पायलट्स कडे हजारो तासांचा हेलिकॉप्टर उडविण्याचा अनुभव आहे.आमच्या पायलट्सनी यापूर्वी भारतीय सेनेसाठी सुद्धा आपली सेवा दिलेली आहे. अगदी माउंट एव्हरेस्ट च्या सर्वोच्च बिंदूपर्यंत उडण्याची या हेलिकॉप्टर ची क्षमता आहे. 

ते पुढे म्हणाले कि,हेलिकॉप्टर च्या खाली मजबूत साखळीला हुक बांधून त्याच्या सहाय्यतेने टॉवर उभारणीसाठी लागणारे साहित्य दुर्गम ठिकाणी पोहोचविले जाते. आत्ताचे तापमान आणि भौगोलिक परिस्थिती पाहता ८०० ते ८५० किलोग्रॅम वजनाचे साहित्य एका वेळेस उचलून डोंगरातील साईट वर पोहोचविले जाते. उड्डाण करताना सुरक्षेच्या साऱ्या नियम आणि निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. या प्रक्रियेत सहभागी हर एक कर्णाचऱ्याला रोज संचलन आयोजित करून सुरक्षा राखण्याचे खडतर प्रशिक्षण दिले जाते.उड्डाण क्षेत्रातील निष्णात अधीकारी या साऱ्या प्रक्रियेची हाताळणी करत असतात. वाहून न्यावयाचे साहित्य मजबूत साखळ्या,लोखंडी पट्ट्या यांनी बंदिस्त केले जाते जेणेकरून प्रत्यक्ष उड्डाण वाहतुकीच्या दरम्यान कुठलीही क्षती होऊ नये.प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे ध्येय्य डोळ्यापुढे ठेऊन आम्ही सारे काम करत आहोत तसेच हेलिकॉप्टर चा वापर करत प्रकल्प उभारणी केल्याने पर्यावरण रक्षण देखील होत आहे. दुर्गम ठिकाणी टॉवर उभारताना इतर वेळी रास्ता बनवून साहित्य पोहोचवावे लागते,त्यात झाडांची कत्तल होते. वन्यजीवांच्या नैसर्गिक निवाऱ्यांना नुकसान पोहोचते. कित्येक वेळेस वन्य जीव प्राणास मुकतात. हेलिकॉप्टर च्या वापराने वन्य संपदा अबाधित राहाते.अतिरिक्त मनुष्य बाळाचा वापर टळतो,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेळेची बचत होते. मुंबई ऊर्जा मार्ग हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून वाटेत येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करत प्रकल्प पूर्तीचे ध्येय्य साधण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण