कल्याण- टिटवाळा परिसरातील माता मंदिर ते इंदिरानगर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून पाण्याची समस्या होती. या भागात आठ इंची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आला. या भागातील गेल्या अनेक दिवसापासूनची पाणी समस्या जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होताच सुटणार आहे. या भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
माता मंदिर ते इंदिरानगरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक मयुर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी पाठपुरावा केला होता. जलवाहिनी टाकण्यासाठी आमदार भोईर यांनी मयूर आणि नमिता पाटील यांच्या प्रभागात ४० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला. याच निधीतून हे काम मार्गी लागणार आहे. या कामाचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते आज दुपारी करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्यासह डब्लू सिंग उपस्थित होते. जलवाहिनी टाकण्याच्या कामासोबत मेन रस्ता ते फकरु गफूर यांच्या घरापर्यंत रस्त्याकरीता १५ लाख, मशीद ते तलाव रस्त्याकरीता २० लाख, सावळाराम पाटील नगर बल्याणी टेकडी परिसरातील रस्त्याकरीता २५ लाख रुपयांचा निधी आमदारांनी उपलब्ध करुन दिला आहे. हे रस्ते सिमेंट का’न्क्रीटीकरणाचे करण्यात येणार आहे. यावेळी आमदार भोईर यांनी सांगितले की, माजी नगरसेवक पाटील यांचे प्रभागात चांगले काम आहे. त्यांनी चांगली कामे मार्गी लावली आहे. त्यामुळे रस्तेआणि जलवाहिनी कामाकरीता एकूण १ कोटीचा विकास निधी दिला असून ही कामे सुरु होत आहे. याविषयी समाधान आहे.