कल्याण: डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आज कल्याण पश्चिम आणि पूर्व भागतील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली. कल्याण पश्चिमच्या शहर प्रमुख रविंद्र पाटील, कल्याण पूर्व, अंबरनाथ, उल्हासनगर महिला जिल्हा संघटकपदी छाया वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. कल्याण पश्चिम महिला संघटकपदी नेत्रा उगले यांची निवड केली. कल्याण पूर्व उपजिल्हा प्रमुख मल्लेश शेट्टी, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, शहर प्रमुखपदी महेश गायकवाड, विधानसभा समन्वयपदी प्रशांत काळे, उपशहर प्रमुखपदी विशाल पावशे आणि नवीन गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
'बाळासाहेबांची शिवसेना'ची कल्याण कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 7:22 PM