कल्याण-कल्याण पश्चिमेत स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे १४ गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हे काम होणार असल्याने कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूकीत रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यत पुढील काही दिवस बदल करण्यात आला आहे.
या अंतर्गत वल्ली पीर चौकाकडून कल्याण रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वल्लीपीर चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने गुरुदेव हॉटेल कल्याण रेल्वे स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील. भानू सागर टॉकीजकडे जाणारी वाहने बैल बाजार स्मशान भूमी मार्गे इच्छित स्थळी जातील. तर कल्याण रेल्वे स्टेशन कडून वल्लीपीर चौकाकडे जाणाऱ््या सर्व प्रकारच्या वाहनांना साधना हॉटेल आणि अर्चिस गॅलरी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने साधना हॉटेल आणि अर्चिस गॅलरी येथून डावे वळण घेऊन गुरुदेव हॉटेल मार्गे येथे स्थळी जातील. तर भानू सागर टॉकीजकडे जाणारी वाहने साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावे वळून घेऊन गुरुदेव हॉटेल चौक बैल बाजार स्मशानभूमी मार्गे येथे इच्छितस्थळी जातील, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी दिली.