डोंबिवली: डिसेंम्बर महिन्यापासून येथील २७ गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात सीसी रत्यांच्या कामामुळे एमआयडीसी भागातील अनेक ठिकाणी खोदकाम आणि अन्य कामात जलवाहिनीला धक्का लागल्याच्या कारणाने त्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
या सततच्या घटनांमुळे दुष्काळात तेरावा महिना।अशी टीका येथील रहिवासी करत आहेत. जेथे काम करायचे आहे त्या ठिकाणी वेळीच नियोजन करून एमएमआरडीए, एमआयडीसी, महापालिका या यंत्रनांनी जर लक्ष दिले तर अशा घटना घडणार नाहीत, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, या सर्व यंत्रणांचा एकमेकांमध्ये समन्वय नसल्याने अशा समस्या येत आहेत, वारंवार सांगूनही, तक्रारी करूनही काहीही फायदा होत नसून उलट रोज नव्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी राहणे मुश्किल।झाल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
सातत्याने याबाबत आवाज उठवला आतापर्यंत या सीसी रस्त्याच्या कामामुळे २७ वेळा जलवाहनी फुटली असून सहा महिन्यांपासून हा त्रास जाणवत आहे. पण कोणतीही यंत्रणा याकडे गांभीर्याने बघत नाही ही रहिवाश्यांची शोकांतिका आहे : राजू नलावडे, दक्ष नागरिक.