डोंबिवली: एमआयडीसी निवासी मधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रस्त्यावरील महावितरण कार्यालयाजवळ रस्ते कामाच्या वेळी पाण्याची पाइपलाइन शनिवारी फुटली होती. ती पाइपलाइन दुसऱ्या दिवशी तात्पुरती दुरुस्त करण्यात आली होती. परंतू अजूनही पाच दिवस झाले तरी त्यातून पाण्याची गळती अद्याप चालू असून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
या पाणी गळतीची रस्ते बनविणाऱ्या ठेकेदाराला आणि एमआयडीसी प्रशासन दखल का घेत नाही असा सवाल दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी केला आहे. यंदा पाऊस खूप पडल्याने आणि धरण भरल्याने प्रशासनाला पाण्याची चिंता नाही का असेही ते म्हणाले. मे महिन्यात एमआयडीसी भागात सीसी रस्त्यांच्या कामामुळे सर्वत्र २७ वेळा।जलवाहिनी फुटल्या।होत्या, त्यामुळे तेव्हाही नागरिकांना त्याचा त्रास झाला होता. पाण्याची नासाडी होऊ देऊ नका असे नलावडे यांनी एमआयडीसी प्रशासनाला आवाहन केले आहे.