मुरलीधर भवार-कल्याण - नैसर्गिक जल स्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासठी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. त्याला दीड दिवसांच्या गणेश विसर्जनास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणाऱ्यांच्या पाठीवर महापालिकेने कौतुकाची थाप दिली आहे. काल रात्री वसंत व्हॅली येथे तयार केलेल्या कृत्रिम तलावाचा वापर करणा-या श्री गणेश मंडळाना आणि व्यक्तींना महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान देण्यात आले. या प्रसंगी आयुक्तांनी डोक्यावर कोळी टोपी परिधान केली होती.
महापालिकेने गणेश विसर्जनासाठी महापालिकेने ६३ कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे, या कृत्रिम तलाव आणि विसर्जन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले होते. गणेश भक्तांना घरानजीक विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध दिली आहे. यामुळे वाहतुक कोंडीलाही आळा बसेल. गणेशभक्तांनी कृत्रिम तलावाला प्राधान्य दिले आहे. लोकांनी शाडुच्या मातीचा वापर यावर्षी मोठया प्रमाणात केला आहे. ही एक चांगली बाब आहे.
महापालिकेने निर्माल्य संकलनासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. त्यापासून आपण खत निर्माण करुन वेगवेगळया ठिकाणी ट्री प्लानटेशनसाठी त्याचा वापरणार करणार आहे. शहर अभियंता अनिता परदेशी, माजी पालिका सदस्य सुनील वायले, उपायुक्त अतुल पाटील, अवधुत तावडे, प्रसाद बोरकर, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे आदी उपस्थित होते. आयुक्तांनी दुगार्डी गणेश घाट येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी कल्याण कोळीवाड्यामधील कोळी बांधवांच्या परिश्रमाची प्रशंसा केली. विसर्जनसाठी कोळी बांधवांच्या सक्रिय सहभागाबाबत कृतज्ञता व्यक्त ते देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले.