कल्याण-कल्याण पूर्व भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मी पाठपुरवा केला आहे. निवडणूका जवळ आल्याने दलित समाजाला खूष करण्यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न आहे. दलितांना खूष करायचे असल्यास समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे. तेव्हा दलित तुमच्या पाठीशी उभे राहतील असा पुनरुच्चार करीत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
स्मारकाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याने स्मारक समितीसह शिवसेना आणि रिपाईच्या कार्यकत्र्यानी आज स्मारकाच्या नियोजीत जागेच्या ठीकाणी ढोलताशे वाजवून जल्लोष साजरा केला. त्या पश्चात भाजप आमदार गायकवाड यांनी उपरोक्त टिका केली आहे. आमदार गायकवाड यांनी सांगितले की, स्मारक तयार करण्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी प्राप्त करण्यासाठी मी पाठपुरावा केला. स्मारक ड प्रभाग क्षेत्र कार्यालयानजीक उभारवे अशी मागणी केली होती. त्यासाठी केलेल्या पत्र व्यवहाराचे पुरावे गायकवाड यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर स्मारक होई र्पयत त्याठिकाणी आंबेडकर अनुयायांकरीता फायबरचा पुतळा उभारला होता. आत्ता निवडणूका आल्या आहेत. त्यामुळे दलितांना खूष करण्यासाठी स्मारकाचा मार्ग मोकळा करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. स्मारक होतेय ही आनंदाची बाब असली तरी हेच स्मारक करीत असताना त्यात अडथळे आणण्याचे काम करण्यात आले होते. स्मारका प्रमाणोच समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी यापूर्वीच राज्य सरकारकडे केली आहे. त्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. ही मागणी मान्य करावी याचा पुनर्रच्चार गायकवाड यांनी केला आहे.
आमदारांनी साधलेल्या निशाण्यापश्चात शिवसेनेच्या पदाधिका:यांनी सांगितले की, या आधी भाजपचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे स्मारकाच्या कामाच्या कामात दिरंगाई झाली. त्याला शिवसेना कशी काय जबाबदार असू शकते.