डोंबिवली: काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी अशी तिघांची नावे आहेत. हे सर्वजण कुटुंबासमवेत शनिवारी काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते.
मृत झालेले तीघे ही डोंबिवली पश्चिमेला राहणारे आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी धडकताच ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान मृत झालेले तीघेही शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे नातेवाईक आहेत. तिघांचा दहशतवादी हल्यात मृत्यू झाल्याच्या बातमीला कदम यांनी दुजोरा दिला. ते बुधवारी पहाटे काश्मीरला रवाना होत असून मृतांचे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात आहेत असे कदम म्हणाले.सोसायटीची मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये आपण कुटुंबासह जम्मू-काश्मीर येथे फिरायला जाणार अशी माहिती अतुल मोने यांनी दिली होती... मोने हे आमचे खूप चांगले मित्र होते असं सांगताना शेजारी भावूक झाले.
सोसायटीची मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये आपण कुटुंबासह जम्मू-काश्मीर येथे फिरायला जाणार अशी माहिती अतुल मोने यांनी दिली होती... मोने हे आमचे खूप चांगले मित्र होते असं सांगताना शेजारी भावूक झाले ...