धनलाभासाठी पूजा केली जात असल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत उघडकिस आली आहे. हा सर्व सुरू असताना काही नागरीकांच्या लक्षात आला. त्यांनी या प्रकरणी विचारपूस करताच पूजा अर्चा करणाऱ्यांनी कासवाला तेथेच सोडून त्या ठिकाणाहून पळ काढला .प्राणी मित्र संघटनेने हे कासव ताब्यात घेतले असून वन विभागाच्या मदतीने कासव जंगलात सोडण्यात आले असल्याची माहिती वॉर फाऊंडेशन प्राणी मित्र संघटनेने दिली आहे.
कल्याण पूर्व परिसरात साकेत कॉलेज रोडवर एका झाडी झुडपात काहीजण कासवांसोबत काही अघोरी कृत्य पूजा अर्चना करत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले .त्यांनी जाब विचारताच या लोकांनी घाबरून तेथून त्या ठिकाणाहून पळ काढला. त्या ठिकाणी स्टार जातीचा कासव व पूजेचे साहित्य पडलेलं नागरिकांना आढळून आलं . नागरिकांनी याबाबत तत्काळ प्राणी मित्र संघटनेला माहिती दिली .वार फाउंडेशनचे प्रेम आहेर यांनी घटना सगळी धाव घेतली. या कासवाला ताब्यात घेतले हे कासव वन विभागाच्या ताब्यात दिले आहे असी माहिती प्रेम यांनी दिली आहे. अंधश्रद्धेपोटी कासवांच्या जीवाशी खेळ करू नका असा आवाहन देखील प्रेम आहेर यांनी केला आहे
स्टार जातीच्या कासावावर जादू टोणा करत ,पूजा केल्याने झटपट श्रीमंत होता येते या अंधश्रध्देमुळे या प्रजातीच्या कासवांची तस्करी वाढली आहे .कल्याण वन विभाग व प्राणीमित्र संघटनांनी अनेकदा असे कासव जप्त करत त्यांना जीवदान दिले आहे. वनविभाग प्राणी मित्र संघटनाकडून स्टार जातीचे कासव बाळगण्यास ,पाळण्यास बंदी आहे या जनजागृती केली जात आहे ,या कासवामुळे धनलाभ होतो ही अंधश्रद्धा असल्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहेत .त्यानंतर आज ही अंधश्रद्धेच्या आहारी जात चोरी छुप्या पद्धतीने या कासवांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे हेच या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे.