डोंबिवली: पोलिस रेझिंग डे च्या निमित्ताने दोन ते आठ जानेवारी या कालावधीत वाहतुक शाखेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरूवारी डोंबिवलीसह कल्याणमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये शालेय विदयार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत माहीती देण्यात आली.
पोलिस रेझिंग डे कालावधीत वाहतूक नियमन सुरळीत व्हावे याबाबतचे महत्व नागरिकांना पटवून दिले जात आहे. याबाबत व्यापक जनजागृती सुरू आहे. डोंबिवली वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे यांच्यावतीने वाहतूक शाखेच्या कार्यालय परिसरात विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले गेले तर कल्याणमध्ये वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी आणि कल्याण पश्चिमचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक गिरीश बने यांच्या वतीने विदयार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. कॅप्टन रवींद्र माधव विदयालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात इ-चलान, वॉकीटॉकी, ब्रेथ अॅनालायझर मशीन यांची माहिती आणि पीपीटी द्वारे मार्गदर्शन केलेे गेले.