डोंबिवली: एरव्ही तेरव्ही तांत्रिक बिघाड, सिग्नल फेल, ट्रॅक फ्रॅक्चर आदी कारणांमुळे विलंबाने धावणारी मध्य रेल्वे बुधवारी धुक्याने वाट अडवल्याने १५ मिनिटे विलंबाने धावली. त्यामुळे बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, कसारा, कर्जत मार्गवरील वाहतूक प्रभावित झाली. याचा फटका ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या लाखो चाकरमान्याना बसला, परंतु धुक्याची मजा लुटत या विलंबाचा प्रवाशांनी आनन्द लुटला.
आता धुक पडल्याने पाऊस येणार नाही लवकरच थंडी पडणार अशी चर्चा करत प्रवास करण्यात आला. कल्याण ते दिवा आणि ठाणे मार्गावर देखील धुके पडलेले होते, त्यामुळे तेथेही वाहतूक धीम्या गतीने पुढे गेली. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने पहिल्या सत्रातील या वाहतूक विलंबाबाबत ही माहिती दिली. त्यामुळे मात्र बहुतांशी स्थानकांमध्ये सकाळच्या वेळेत बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, टिटवाळा, शहाड, उल्हासनगर,।कल्याण,।डोंबिवली, दिवा आदी ठिकणी अप डाऊन दोन्ही ठिकाणी फलाट तुडुंब भरलेले निदर्शनास आले.