डोंबिवली : कॅप्टन विनयकुमार संचान यांना काश्मीर मध्ये अतिरेक्यांशी लढताना 24 मार्च 2003 रोजी अवघ्या 25 वर्षाचा या युवकाला देशासाठी लढताना वीरमरण आले होते. कल्याणडोंबिवली महापालिकेने संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल बाहेर घरडा सर्कल येथे विनयकुमार सचान स्मृतिस्थळ उभे केले असून दरवर्षी 24 मार्च रोजी तेथे नागरिक येऊन तेथे मानवंदना देत असतात. सद्या कोरोना मुळे सदर मानवंदना देण्याचा कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होतो.
डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात कॅप्टन विनयकुमार सचान राहत होते. त्यांचे शालेय शिक्षण एमआयडीसी मधील सिस्टर निवेदिता स्कूल मध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण पेंढारकर कॉलेज मध्ये झाले. एमआयडीसी निवासी भागातही त्याचे स्मृतिस्थळ उभे करण्यात आले आहे. आजचा दिवशी त्याचा एमआयडीसी निवासी मधील राहत्या घरी आणि स्मृतिस्थळावर जाऊन अनेक नागरिक त्याला आदरांजली वाहण्यासाठी जात असतात. कॅप्टन विनयकुमार सचान अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्याचे सामजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.