कल्याण- पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांचे १०० व्या वर्षी दुःखद निधन झाल्या. 'आई आणि मुलाच्या भावूक प्रेम' प्रसंगाचे चित्र रेखाटून पंतप्रधान मोदींच्या आईंना कला शिक्षकाने श्रद्धांजली अर्पिण केली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचे गुजरातमधील गांधीनगर येथे नुकतेच निधन झाले. यानंतर, त्यांना कल्याणमधील वाणी विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले यश महाजन यांनी रंग खडूच्या माध्यमातून आई आणि मुलातील भावून प्रेम प्रसंगाचे चित्र रेखाटत त्या माध्यमातून हिराबेन माेदी यांना श्रद्धांजली अर्पिण केली. कला शिक्षक महाजन यांनी दोन बाय दिडच्या साईज बोर्डवर हे चित्र रेखाटले आहे. हे चित्र साकारण्यासाठी त्यांना दीड ते दोन तास लागले. महाजन यांनी आई आणि मुलाच्या भावून प्रेमाचे चित्र रेखाटून श्रद्धांजली दिली असून इश्वर मोदी कुटूंबाला दु:ख पेलण्याची शक्ती देवो हा संदेश दिला आहे.
महाजन हे वाणी विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ख्यातनाम सिने अभिनेते अमिताभ बच्चन यासारख्या अनेक महापुरुषांचे रांगोळी माध्यमांतून चित्रे साकारली आहेत.