कल्याण-नशेसाठी कफ सिरपच्या बाटल्या विकणाऱ््या दोन जणांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. इरफान शेख आणि शौकत शेख अशी या अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी इस्कूप नावाच्या कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
कल्याण स्टेशन परिसरात नशेखोरांचा वावर असतो. काल कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांनी काही तरुण नशेसाठी कफ सिरप विकत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्यांच्याकडे कफ सिरपच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील कफ सिरफच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. या कफ सिरपच्या बाटल्या नशेसाठी विकल्या जात होता. एक बाटली पूर्ण पणे प्राशन केल्यावर नशा येते. नशेकरीता या कफचा वापर केला जातो. जप्त करण्यातआलेल्या कफ सिरपच्या बाटल्या विक्री करण्यावर बंदी आहे. तरी देखील या कफ सिरपच्या बाटल्या या दोन आरोपींनी कूठून आणल्या. त्यांना त्या कशा उपलब्ध झाला. त्यामागे मोठे र’के ट आहे का आदी अंगाने महात्मा फुले पोलिस तपास करीत आहे.
ज्यावेळी या दोन जणांना पोलिसांनी स्टेशन परिसरातून अटक केली. त्यांच्या जोडीला अन्य एक तरुण होता. तो देखील याच कफ सिरपच्या बाटल्या विकत होता. पोलिस तो पोलिसांना पाहताच पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलिस निरिक्षक प्रदीप पाटील यांनी दिली आहे.
दोनच दिवसापूर्वी भिवंडी येथून याच कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्याची कारवाई भिवंडी पोलिसांनी केली होती. त्यामुळे कल्याणमधील अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचे कनेक्शन भिवंडी प्रकरणाशी आहे का या अंगानेही या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.