मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण-कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात दोन पोलिस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या सोपविलेलील जबाबदारी त्यांनी योग्य प्रकारे पार पडली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अनिल जातक आणि महादेव चेपटे अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे. कल्याण पश्चिमेतील चिराग हॉटेल परिसरात सोमवारी दोन गटात वाद झाला होता. एका गटातील काही तरुण आपली चार चाकी वाहने घेऊन त्याठिकाणाहून जात होते. या दरम्यान घोषणाबाजी सुरु केली. घोषणाबाजी ऐकताच दुसरा गट त्याठिकाणी आला.
गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एका गटाने दुसऱ्या गटाच्या गाड्या फाेडल्या. पोलिसांनी ही परिस्थिती कशीबशी हाताळली. या प्रकरणात दोन पोलिस कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत. यामध्ये सोशल मिडिया फेम अनिल जातक या पोलिसाचा समावेश आहे. कोरोना काळात जनजागृती करण्यासाठी अनिल जातक यांनी चांगले काम केले होेते. नागरीकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. हे पाहता. त्यांना चिराग हॉटेल परिसरात एका ठिकाणी कर्तव्य बजाविण्याकरीता नेमण्यात आले होते. त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारी महादेव चेपटे हे देखील होते दुपारच्या दरम्यान जेवणाकरीता हे दोघेही पोलिस कर्मचारी दिलेला पा’ईंट सोडून गेले. याच वेळी एका गटातील तरुण त्याच्या गाड्या घेऊन ब’रेकेट हटवून आत गेले. त्याठिकाणी गोंधळाची परिस्थिती उद्धवली. यावेळी काही अप्रिय घटना घडली नाही. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. मात्र ज्या पोलिसांवर ही जाबाबदारी होती. त्यानी बेजबाबदारपणा दाखविल्याने त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली गेली.