शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

कल्याणमध्ये दोन सराईत चोरटे ताब्यात; १२ लाखाचे दागिने हस्तगत

By सचिन सागरे | Published: March 10, 2024 3:18 PM

कोळशेवाडी पोलिसांची कामगिरी

कल्याण : कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या या दोघा चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल १२ लाखाचे दागिने हस्तगत केले आहेत.

कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राजेश राजभर, राहुल घाडगे अशी दोन चोरट्यांची नावे आहेत. राजेश विरोधात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार, मुंबई, पुणे येथील पोलिस ठाण्यात ३० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर पगारे, पोलीस अधिकारी मदने, सुशील हांडे, सुरेश जाधव, सचिन कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. खबऱ्यांनी दिलेली माहिती व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा रचला होता. 

विठ्ठलवाडी बस डेपोजवळ रचलेला सापळ्यात सराईत चोरटा राहुल घाडगे याला पकडण्यात पोलिसांना यश आले. राहुल घाडगे विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यातच तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले. याच दरम्यान कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करण्यात सराईत असलेला राजेश राजभर हा उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी उत्तर प्रदेश आजमगड येथील लालगंज परिसरात वेशांतर करून सापळा रचला व त्या ठिकाणाहून राजेश राजभर याला बेड्या ठोकल्या. कोळशेवाडी पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून चार गुन्ह्यांची उकल करत दहा लाखांचे दागिने हस्तगत केले. चोरी केलेले दागिने राजेश त्याच्या परिवारातील त्याचे वडील, भाऊ व वहिनी यांच्या मार्फत सोनारांना विक्री करत होता व आलेल्या पैशातून त्याचे कुटुंब उपजीविका करत होते.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी