शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

चोरलेल्या बॅटऱ्यांची विक्री करण्याच्या तयारीत असलेली ‘दुकली’ गजाआड, मोठ्या वाहनांच्या तीन बॅटऱ्या जप्त

By प्रशांत माने | Published: June 20, 2024 6:30 PM

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

डोंबिवली: तीन टेम्पोच्या बॅट-या चोरून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सुहास उर्फ चिंग्या विजय पाईकराव ( वय २१) आणि रॉकी उर्फ मोनू रमेश चव्हाण ( वय १८ ) दोघेही रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, डोंबिवली पूर्व या दोघा चोरटयांना बुधवारी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा लावून अटक केली. तीन बॅट-या असा ८ हजाराचा मुद्देमाल दुकलीकडून जप्त केला असून त्यांना टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोनजणांनी टेम्पोच्या मोठया बॅट-या कोठून तरी चोरून आणल्या असून त्या विकायला मानपाडा शीळ रोडवरील प्रीमियर कॉलनी मैदानाजवळ येणार आहेत. या मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले, पोलिस हवालदार बालाजी शिंदे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, दिपक महाजन आणि अमोल बोरकर यांचे पथक दोघे चोरटे येणार त्याठिकाणी रवाना झाले. पथकाने सापळा लावला. बुधवारी दुपारी ३.३० वाजता बातमीदाराने केलेल्या वर्णनाप्रमाणे दोघेजण रिक्षातून उतरले. त्यांच्या हातात गोण्या आणि त्यात काहीतरी जड वस्तू होती. संशयावरून दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यात तीन बॅट-या आढळुन आल्या. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी बॅट-या चोरल्याची आणि त्या विकण्यासाठी आल्याची कबुली दिली.

स्मशाल चौकातील टेम्पोच्या बॅटऱ्या चोरल्या -आरोपी सुहास आणि रॉकी यांनी डोंबिवली पुर्वेकडील शेलार नाका जवळील स्मशाल चौकात पार्क केलेल्या दोन अॅपे टेम्पो आणि एक टाटा टेम्पो अशा तीन गाडयांमधून या तीन बॅट-या चोरल्या होत्या. या चोरीप्रकरणी टेम्पो मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान दोघा आरोपींना टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून बॅट-या चोरीचे आणखीन काही गुन्हे उघडकीस येतात का? याचा तपास टिळकनगर पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोर