कल्याण-बैलगाडा शर्यतीत रिव्हा’ल्वर व बंदूकांनी अंधाधुंद फायरींग करुन जीवे ठार मारण्याच्या कटातील पाहिजे असलेल्या दोन आरोपींना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे किरण अशोक गायकवाड (३५) आणि दीपेश तुलशीराम जाधव (३०) अशी आहेत. किरण हा डोंबिवलीतील देसलेपाड्यात राहणारा आहे. तर दीपेश हा आडीवली गावचा रहिवासी आहे. पोलिस या दोघांच्या शोधात होते. त्यांच्या विरोधात पोलिसांकडून मोक्काची करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये आडीवली येथे राहणारे राहूल पाटील व त्यांच्या साथीदारांसोबत अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील सुदामा हॉटेल येथे चर्चा करायची असे प्लानिंग करुन त्यांच्या जीवे ठार मारण्याचा कट रचला. रिव्हा’ल्वर आणि बंदूकातून फायरिंग करुन खून करण्याचा पंढरीनाथ फडके आणि त्या्च्या साथीदारांनी प्रयत्न केला होता. या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात काही आरोपी अटक करण्यात आले. तर काही आरोपी फरार आहेत. त्यापैकी आरोपी किरण गायकवाड आणि दीपेश जाधव हे दोघे जण कुठेतरी बाहेर जाण्याकरीता कल्याण शीळ रोडवरील रुणवाल गृहसंकुलाच्या गेटवर भेटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार दोन्ही आरोपी त्याठिकाणी आले. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. आरोपी किरण हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. दोन्ही आरोपी गेल्या दीड वर्षापासून होते. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक अजित शिंदे, सहाय्यक पाेलिस निरिक्षक संतोष उगलमुगले आणि उप निरिक्षक दत्ताराम भोसले यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद करण्याची कारवाई केली आहे.