शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
3
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
4
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
6
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
7
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
8
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
9
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
10
"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?
11
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
12
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
13
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
14
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
15
प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
16
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
17
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
18
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला चॅम्पियन; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
19
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा
20
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला

"उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करुन दिली नाही, म्हणून एकनाथ शिंदे आमच्यासोबत", भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे विधान

By मुरलीधर भवार | Published: September 14, 2022 4:22 PM

Ganpat Gaikwad: राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करु दिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले असे विधान कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यांनी केले आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण - राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करु दिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले असे विधान कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यांनी केले आहे.एका सोशल मिडियावर काही सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकत्र्यानी आमदार गायकवाड यांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी आमदार गायकवाड यांनी सोशल मिडियावर चर्चा करण्यापेक्षा खुली चर्चा करा. समोर येऊन कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी समर्थ आहे असे आव्हान दिले होते. त्यानुसार आज ड प्रभाग कार्यालयाच्या समोर समाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद तिवारी यांच्यासह काही नागरीक यांच्याशी चर्चा करण्यासाठी आमदार गायकवाड आले होते. यावेळी चर्चेच्या दरम्यान आमदार गायकवाड यांनी उपरोक्त विधान केले.

आमदार गायकवाड यांनी सांगितले की, राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. या दोन्ही नेत्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मी मिळून फूल स्पीडने कल्याण पूर्व मतदार संघाचा विकास करुन अशी हमी उपस्थित जागरुक नागरीक वर्गाला दिली. शहरातील विकास कामांसंदर्भात तिवारी यांच्यासह अन्य नागरीकांनी पंधरा मुद्यावर आमदार गायकवाड यांनी चर्चा केली. त्यांनी नागरीकांच्या सगळ्य़ा प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. एखाद्या विकास कामासाठी किती निधी प्राप्त झाला. एखादे काम झाले आहे. तर एखादे काम का झाले नाही. ते न होण्यामागचे तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे काय आहेत. त्याची सविस्तर माहिती दिली.

कोणती कामे नगरसेवकांशी संबंधित आहे. कोणती कामे खासदार आणि आमदारांशी संबंधित आहेत या विषयीची माहिती उपस्थितांना दिली. तसेच नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी २४ तास उपलब्ध असतो. नागरीक माङयाकडे अनेक प्रश्न घेऊन येत असतात. त्याउपरही मी दर रविवारी नागरीकांच्या भेटी गाठीसाठी वेळ राखून ठेवतो. प्रत्येक नागरीकांना कार्यालयात भेटून त्यांची समस्या जाणून घेतो. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतो. तसेच त्यांचा आढावा घेऊन समस्या सोडविल्यावर त्या नागरीकाला फोन करुन सांगतो की, त्याचे काम झाले आहे किंवा किती दिवसात मार्गी लागणार आहे. त्यामुळे काही प्रश्न सुटले नसतील तर ते का सुटले नाही. त्याची कारणो काय आहे. हे जाणून घेऊन आरोप केले पाहिजे. थेट कोणावर काही आरोप करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा अधिकार नागरीकांना आहे. तो त्यांनी विचारलाच पाहिजे याकडे आमदार गायकवाड यांनी यावेळी लक्ष वेधले.

टॅग्स :kalyanकल्याण