डोंबिवली: आगरी पाडा येथे ड्युटीवर असलेल्या प्रदीप सुरेश सोनवणे यांचे पाकीट अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीचा फायदा घेत एका अज्ञताने चोरले, ते चोरल्यावर घाईगडबडीत रेल्वे ट्रॅकमधून पळ काढताना त्याचा सिंहगड एक्स्प्रेसखाली येऊन अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या जवळील पाकीट, पॅन कार्ड वरील माहितीवरून सोनवणे या पोलिसाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती सर्वत्र व्हायरल झाली. प्रत्यक्षात पोलीस जिवंत असून त्यांनी याबाबत गोंधळ उडू नये म्हणून लगेच संदेश व्हायरल करून त्यामागची सत्यता सांगितली.
या गोंधळ, अपघात घटनेमुळे कल्याण लोहमार्ग।पोलिसांची बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत धावपळ झाली, आणि अखेर सत्य समोर आले. त्याबाबत सोनवणे यांनी व्हायरल केलेल्या संदेशात म्हंटले आहे की, ते प्रदीप सुरेश सोनवणे , आगरी पाडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून बुधवारी सकाळी दिवस पाळी कामावर जात असताना अंबरनाथ स्टेशन येथे आले. तेथून अंबरनाथ ते भायखळा प्रवासासाठी सकाळी ७.५१ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल पकडत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या पॅन्टच्या पाठीमागच्या खिशातून माझे पाकीट चोरले. परंतू लोकल चालू झाल्याने त्यांना ट्रेन मधून उतरता आले नाही. दरम्यान त्या अज्ञात इसमाचा अपघात झाला, त्यात तो मयत झाला. त्याच्याकडे सोनवणे यांचे पाकीट असल्याने सगळीकडे त्यांच्या नावाचा मेसेज फॉरवर्ड झाली}. सध्या व्यवस्थित असून, आगरीपणा पोलीस स्टेशन येथे दिवस पाळी कर्तव्यावर आहे, मला मानसिक त्रास होत असून कोणीही माझ्या नावाचा मेसेज फॉरवर्ड करू नका असेही त्यांनी जाहीर केले.
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८.४१ वाजता अंबरनाथ रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक ०३वरून सिंहगड एक्सप्रेस जात असताना एक इसम हा प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून रेल्वे ट्रॅक क्रॉस करित असताना सदर सिंहगड एक्सप्रेसखाली सापडून जागीच मयत झाला. त्या घटनेनंतर त्यास उपजिल्हा रुग्णालय छाया हॉस्पिटल अंबरनाथ येथे नेले असता ऑन ड्युटी डॉक्टर यांनी तपासून तो इसम घटना घडल्या ठिकाणी जागीच मयत झाल्याचे सांगून सकाळी १०.१० वाजता डेथ कार्ड दिल्याने कल्याण रेल्वे पोलीस ठाणे अपमृत्यू अशी नोंद करण्यात आली असून मयताच्या वारशाचा तपास करण्याचे काम सुरू असल्याचे ढगे म्हणाले.