कल्याण- भारतीय जनता पक्षाने पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभेत भाजप निवडून निवडून आणण्यासाठी भाजपनं केंद्रीय नेत्यांकडे ही जबाबदारी दिली आहे. विरोधी पक्षांचे बालेकिल्ले काबीज करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाची महत्त्वाची जबाबदारी प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे. ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान ते कल्याण उल्हासनगर व अंबरनाथ केंद्रीय मंत्री ठाकूर आज डोंबिवलीत येणार असून भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघातील प्रमुख जेष्ठ कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका करणार आहेत. तर आज 2000 कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन भाजप कडून करण्यात आले आहे.तसेच डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात भाजप तर्फे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे.त्यामुळे भाजप तर्फे एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केले जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.