कल्याण - ए काश अपने मुल्क मे ऐसी फिजा बने, मंदिर जले तो रंज मुसलमान को भी हो. पामाल होने पाये ना मस्जिद की आबरू, ये फिक्र मंदिरों के नीगह्बान को भी हो. हा शेर ज्येष्ठ सिने अभिनेते रजा मुराद यांनी सांगून सध्याच्या राजकीय वातावरणावर काही एक न बोलता शायराना उत्तर दिले आहे. निमित होते कल्याणमधील रोजा इफ्तार पार्टीचे.
कल्याण पूर्वेत सूचक नाका आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांच्या तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तारपार्टीमध्ये मुस्लीम बांधवांसह, हिंदू, बौद्ध इतर समाजाच्या लोकांनी देखील सहभाग घेतला होता. सिने अभिनेता रजा मुराद ,अली खान यांनी या इफ्तार पार्टीत उपस्थित राहून उपवास सोडला. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
यावेळी सध्या सुरू असलेल्या भोंग्यांवरील राजकारणाबाबत बोलताना रजा मुराद यांनी सध्या जे राजकारण सुरू आहे त्याला आजच्या सारखे कार्यक्रमच उत्तर आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन नॉन मुस्लीम बांधवानी केले. मुस्लीम बांधवांसह इतर समाजातील बांधवाणी सहभाग घेतला, असे कार्यक्रम सुरू राहिले पाहिजेत, आम्ही दिवाळी होळी साजरी करू, तुम्ही इफ्तारचे आयोजन करा हे राष्ट्रीय ऐक्य आहे, असे बोलताना भोंग्यावरील राजकारणाला आपल्या शायरीच्या अंदाजात उत्तर दिले.