कल्याण डोंबिवली महापलिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे तिस:या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिस:या लाटेशी सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. डोंबिवलीतील विभा कंपनीज्या जागेत ५३१ बेडचे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आले असून त्यात ५० बेड हे मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजप आमदार रविंद्र चव्हाण,आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह माजी महापौर विनिता राणे, शिवसेना पदाधिकारी विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, राजेश कदम, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी आज दुपारी रुग्णालयाची पाहणी केली.
यावेळी आयुक्तांनी सांगितले की, रुग्णालायची जागा आमदार चव्हाण यांनी सूचित केली. तर खासदारांनी त्यासाठी पाठपुरावा केला. रुग्णालयाच्या उभारणीकरीता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीकडून साडेपाच कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला. रुग्ण संख्या वाढत असल्याने हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज आहे.
यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले की, या रुग्णालयात आयसीयू, ऑक्सीजन आणि व्हेटींलेटर बेडची सुविधा आहे. महापालिकेच्या हद्दीत सध्या आर्ट गॅलरी कोविड रुग्णालय सुरु आहे. त्याठिकाणी सातशे बेडची सुविधा आहे. पहिल्या आणि दुस:या लाटेत महापालिकेने डोंबिवली जीमखान, सावळाराम क्रिडा संकुल, पाटीदार भवन याठिकाणी जंबो कोविड रुग्णालये उभारली. त्याचा रुग्णांना फार मोठा लाभ झाला. पहिल्या आणि दुस:या लाटेत उभारण्यात आलेल्या पायाभूत कोविड आरोग्य सोयी सुविधा या कायम स्वरुपी उपयोगात येणार आहेत. त्याच्याच जोरावर तिस:या लाटेची शक्यता गृहीत धरता तिस:या लाटेचा सामना करणो शक्य होणार आहे. महापालिकेने तिस:या लाटेशी सामना करण्याकरीता ९ हजार बेडची तयारी ठेवली आहे. पहिल्या दु:या लाटेनंतरही महापालिका थांबलेली नाही. त्यामुळेच विभा येथे कोविड रुग्णालय रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज आहे. त्यात महापालिका आयुक्तांसह सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाचे श्रेय आहे. पहिल्या दुसळ्य़ा लाटेत चांगले काम केल्यामुळे महापालिकेस कोविड इन्व्होशन अॅवार्ड मिळाला ही बाब खासदारांनी आवजरून नमूद केली