शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

सोशल मीडियातील व्हायरल ‘बुवा’ला अखेर बेड्या, पत्नीला मारहाण करणं भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 8:24 PM

कल्याण तालुक्यातील मलंगपट्टयातील द्वारली गावातील चिकणकरचा बुवाचा वयोवृध्द पत्नीला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ त्यांच्या नऊ वर्षाच्या नातवाने शूट करीत व्हायरल केला होता

ठळक मुद्देदरम्यान, कल्याणमधील शिवसेनेच्या पदाधिकारी राधिका गुप्ते, आशा रसाळ, राणी कपोते यांसह अन्य कार्यकर्त्यांनी रविवारी संध्याकाळी चिकणकर याचे घर गाठत मारहाण झालेल्या वयोवृध्द महिलेची चौकशी केली

कल्याण : पाणी भरण्याच्या वादावरून वयोवृध्द पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या आणि आळंदीला पसार झालेला हभप गजानन बुवा चिकणकरला हिललाईन पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गंभीर मारहाण आणि शिवीगाळ, दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतापी वृत्तीच्या या बुवामुळे घरातील सर्व मंडळींवर त्याची दहशत आहे. त्यामुळे कोणीही तक्रार दाखल करायला येत नव्हता, अखेर पोलिसांनी स्वत:हून तक्रार दाखल करीत त्याच्यावर फौजदारी कारवाई केली आहे.

कल्याण तालुक्यातील मलंगपट्टयातील द्वारली गावातील चिकणकरचा बुवाचा वयोवृध्द पत्नीला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ त्यांच्या नऊ वर्षाच्या नातवाने शूट करीत व्हायरल केला होता. यात स्वत:ला बुवा म्हणविणाऱ्या चिकणकर महाराजांचे रूप पाहून नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. या व्हिडीओची माहिती मिळताच पोलीस त्याच्या घरी चौकशीकामी गेले असता तो आळंदीला गेल्याची माहिती त्यांना मिळाली. बुवाच्या दहशतीमुळे त्याच्या घरातील कोणीही सदस्य तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येईना. त्याच्या तापट स्वभावामुळे तो वयोवृध्द पत्नीला मारहाण करीत असतानाही कोणीही घरातील व्यक्ती तिला वाचवायला तसेच त्याला रोखायला पुढे आले नसल्याचेही व्हिडीओतून दिसून आले. 

दरम्यान, कल्याणमधील शिवसेनेच्या पदाधिकारी राधिका गुप्ते, आशा रसाळ, राणी कपोते यांसह अन्य कार्यकर्त्यांनी रविवारी संध्याकाळी चिकणकर याचे घर गाठत मारहाण झालेल्या वयोवृध्द महिलेची चौकशी केली. मारहाणीवेळी बघ्याची भुमिका घेणाऱ्या घरातील सदस्यांनाही शिवसेना स्टाईलने दम भरला. आळंदीला पसार झालेल्या बुवाला कल्याणमध्ये दाखल होताच सेनेचा हिसका दाखवून देऊ, असा इशाराही यावेळी दिला गेला. बुवाची घरात प्रचंड दहशत असतानाही रोजच्या मारहाणीला कंटाळलेल्या नऊ वर्षाच्या नातवाने व्हिडीओ शूट करून व्हायरल केल्याप्रकरणी सेना महिला पदाधिकाऱ्यांनी त्याचेही कौतुक केले. डोंबिवलीत आलेल्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही मारहाणीप्रकरणी संताप व्यक्त करीत चिकणकरवर कडक कारवाई व्हायला, हवी अशी मागणी केली.

तक्रारीसाठी पोलीसांचा पुढाकार

दरम्यान मारहाण प्रकरणी चिकणकरच्या कुटुंबातील व्यक्तींनी तक्रार देण्यास नकार दिला. अखेर हिललाईन पोलीसांनी स्वत:हून पुढाकार घेत चिकणकर विरोधात कलम 323, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याची माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक मोहन खांदारे यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी