डोंबिवली: भाजपच्या प्रदेश पातळीवरून संघटनात्मक फेरबदल वेगवान घडामोडी होत आहेत. गेल्या महिन्यात राज्यातील पक्षाचे जिल्हाद्यक्ष बदलण्यात आले, त्यानुसार कल्याण जिल्ह्याचे नाना सुर्यवंशी हे जिल्हाद्यक्ष झाले. मंगळवारी रात्री उशिराने शहर स्तरावरील मंडळ अध्यक्ष नेमले त्यात डोंबिवली पूर्वेला विषु पेडणेकर, पाश्चिमेला समीर चिटणीस यांची वर्णी लागली. पेडणेकर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी म्हात्रेनगर येथून तीन वेळा निवडणूक जिंकली आहे, त्यांचे बंधू नरेंद्र पेडणेकर हे देखील एकदा निवडणुकीला उभे होते.
पेडणेकर कुटुंबीय भाजपशी एकनिष्ठ असून ते सावर्जनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीयांपैकी एक आहेत. अनेक वर्षे त्यांनी युवा मोर्चा, गेली चार वर्षे ते मंडळ सरचिटणीस म्हणून कार्यरत।होते. पाश्चिमेचे समीर चिटणीस हे देखील भाजपचे सक्रिय पदाधिकारी म्हणून अनेक वर्षे कार्यरत आहेत. ते देखील मंत्री चव्हाण यांच्या जवळचे असून त्या दोघांचेही संघटन कौशल्य चांगले आहे. कल्याण पश्चिमेला माजी नगरसेवक वरू ण पाटील यांची नियुक्ती झाली असून पूर्वेला देखील संजय मोरे, डोंबिवली ग्रामीण सूर्यकांत माळकर आदींची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सगळ्यांच्या निवडीबद्दल शहर, जिल्हास्तरावर आनंद व्यक्त करण्यात येत असून तातडीने सगळ्या नव्या अध्यक्षांनी पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली. पक्ष संघटन मजबूत करणे, वाढवणे आणि सामान्य नागरिकांपर्यन्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम पोहोचवणे ही जबाबदारी पार पडणार असल्याची प्रतिक्रिया पेडणेकर यांनी व्यक्त केली.