कल्याण-जागति वसुंधरा दिन आणि स्वातंत्र्यांचा अमृत महाेत्सव याचे औचित्य साधत स्मार्ट आणि केडीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनकार ठाकरे सरोवर अर्थात काळा तलाव येथे आज सकाळी साडे सहा वाजता "वॉकॅथॉन" चे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी वसुंधरेचे संरक्षणार्थ लोक जागृतीसाठी महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले आणि माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांनी केले आणि सूत्रसंचालन महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल स्मार्ट सिटी चे महाव्यवस्थापक प्रशांत भगत यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.