लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या भयानक परिस्थितीत वारंवार बाहेर जाता येत नसल्याने जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यावर उपाय म्हणून प्रभाग क्षेत्र अधिका-यांनी त्यांच्या प्रभाग स्तरावर स्वयंसेवकांची नेमणूक करावी, असे आदेश केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेत.
स्वयंसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच पोचविण्याचे काम केले जाणार आहे. जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणाऱ्या दुकानदारांना जेष्ठ नागरिकांपर्यंत होम डिलिव्हरी उपलब्ध करून देण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्यास दुकानदारांनी स्वयंसेवक उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधित प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी यांच्याशी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे मार्फत करण्यात आले आहे.
प्रभाग क्षेत्र अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे
1/अ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत - 9819504304
2/ब प्रभागक्षेत्र अधिकारीचंद्रकांत जगताप - 9867727361
3/क प्रभागक्षेत्र अधिकारीअक्षय गुडधे - 8411088964
4/जे प्रभागक्षेत्र अधिकारीवसंत भोंगाडे - 9969336832
5/ड प्रभागक्षेत्र अधिकारीसुधिर मोकल - 9594837731
6/फ प्रभागक्षेत्र अधिकारीभरत पाटील - 9967914383
7/ह प्रभागक्षेत्र अधिकारीसुहास गुप्ते - 9819411491
8/ग प्रभागक्षेत्र अधिकारीसंदीप रोकडे - 9869463280
9/आय प्रभागक्षेत्र अधिकारीदिपक शिंदे - 9890571391
10/ई प्रभागक्षेत्र अधिकारीभारत पवार - 8356888300