कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी पॅनल पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ४४ प्रभागांचे नकाशे काल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मात्र प्रसिद्ध करण्यात आलेली प्रभाग रचना ही महापालिकेच्या मंजूर आराखडय़ाशी विसंगत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तूभ गोखले यांनी घेतली आहे. ही हरकत त्यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे लेखी स्वरुपात दाखल केली आहे.
महापालिकेने कालच प्रभाग रचना जाहिर केली. या प्रभाग रचनेत महसूली गावांच्या सार्माक सिमा, विकास योजनेतील प्रस्तावित हद्द आणि प्रस्तावित आरक्षणाचा हद्दी नमूद करण्यात आलेल्या नाहीत. मंजूर विकास आराखडा आणि प्रभाग रचनेचे नकाशे यांच्या विसंगती आढळून येत आहे. गोखले हे बेकायदा बांधका प्रकरणातील याचिकाकर्ते आहे. त्यांची याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यांच्या मते तयार करण्यात आलेल्या नकाशात हद्द दर्शविता एखाद्या इमारतीचा उल्लेख केला गेला आहे. मात्र संबंधित उल्लेख करण्यात आलेली इमारत ही बेकायदा आहे. त्यामुळे तिचा महापालिकेच्या दफ्तरी दस्ताऐवज नाही. महापालिकेच्या दफ्तरी तिची नोंद नाही. ज्या इमारतीचा तपशीलच महापालिका दफ्तरी नाही. त्याचा प्रभाग रचना नकाशात उल्लेख करणो कितपत योग्य आहे असा सवाल गोखले यांनी उपस्थित केला आहे. हरकतीची सुनावणी 26 फेब्रुवारी रोजी होणार असल्याने सुनावणीच्या वेळी कागदपत्रंच्या आधारे ही बाब सुनावणी अधिका:यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत. त्यांनी घेतलेल्या हरकतीच्या आधारे त्यांनी जाहिर करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करुन नव्याने ती तयार करण्यात यावी अशी मागणी निडणूक यंत्रणोकडे केली आहे.
दरम्यान लोकप्रतिनिधी, इच्छूक आणि आजी माजी नगरसेवकांसह पक्षाच्या प्रमुख पदाधिका:यांनी या प्रभाग रचनेचा अभ्यास सुरु केला आहे. त्यानंतर १४ फेब्रुवारीर्पयत लेखी स्वरुपात हरकती सूचना नोंदविल्या जाणार आहेत.