डोंबिवली पार पडली परिषद
कल्याण: नवी मुंबईविमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून थांबविले पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही. मातोश्रीला घेराव घालण्यात येईल. त्याचबरोबर पंतप्रधानाकडे दिल्ली येथे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले जाईल, असा इशारा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला आहे.
दि. बा. पाटील विमानतळ नामकरण समर्थन समितीतर्फे डोंबिवली प्रगती कॉलेजच्या हॉलमध्ये आज एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नामकरण समर्थन समिती कल्याण डोंबिवलीतर्फे विमानतळ नामकरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. लालबावटा रिक्षा युनियन अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर, समिती अध्यक्ष दशरथ पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजरुनबुवा चौधरी, कॉम्रेड कृष्णा भोयर, कॉग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमहापौर गायकवाड यांनी सांगितले की, आत्तार्पयत झालेल्या 19 मुख्यमंत्र्यांनी त्यांचे नातेवाईकांची नावे विकास प्रकल्पाना दिलेली नाही.आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी देखील दि. बा. च्या नावाला विरोधकेला नसता. दि. बा. च्या नावासाठी आगरी समाजाचे केंद्रात प्रथमच मंत्री झालेल कपील पाटील आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे आग्रही आहे. हे दोन्ही लोकप्रतिनिधी समाजाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. समाज निवडणूकीत त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. काँग्रेसचे केणे म्हणाले, केंद्रीय उड्डाणमंत्री यांना भेटून आमची या विषयाची रास्त मागणी त्यांच्यासमोर ठेवणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये ही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते.