कल्याण- गेल्या चार दिवसापासून मूसळधार पाऊस पडला आहे. पावसामुळे वालधूनी नदी दुथडीभरून वाहत आहे. कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदी आणि खाडीचे पाणी आसपासच्या परिसरात शिरले आहे. योगीधाम, गौरीपाडा, अनुपनगर, अशोकनगर, शिवाजीनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासनगर, गोविंदवाडी परिसर हा जलमय झाला आहे. खाडीचे पाण्याची पातळी वाढत आहे.
रस्त्यावर पाणी आल्याने कल्याण मुरबाड रस्ता, कल्याण पुना लिंक रोड, कल्याण गांधारी रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी साचले आहे. कल्याण वालधूनी येथील तबेल्यातही गुडघा भर पाणी साचल्याने या साचलेल्या पाण्यातच म्हशी उभ्या होत्या.कल्याण पश्चिमेतील गोविदवाडी परिसरात शेकडो तबेले आहे. या तबेल्यातील हजारो म्हशी इदगाह रस्त्यावर उभ्या केल्या आहेत.
कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. महापालिकेच्या मोहिली जलशुद्धी करण केंद्रासह शहाड येतील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. कल्याण डोंबिवलीतील पाणी पुरवठय़ावर परिमाण झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे कचरा प्रकल्पात पाणी शिरले आहे.