शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

आम्ही गांधीचे वारसदार, कायदा हातात घेणार नाही, पण...; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By अनिकेत घमंडी | Published: October 04, 2022 1:31 PM

पोलिसी वापर, गुंड लोकांना राजाश्रय नसावा हे नेत्यांनी लक्षात घ्यावे असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

डोंबिवली - हिटलर जनतेच्या रेट्यापुढे टिकू शकला नाही. हा अतिरेक ठाणे जिल्ह्यात सुरू आहे. आम्ही गांधीचे वारसदार आहोत. कायदा हातात घेणार नाही पण अहिंसक आंदोलन करून उभे राहू. जनआंदोलन चिरडता येत नाही. ही वैचारिक लढाई आहे. अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही हे लक्षात घ्यावं असा इशारा माजी मंत्री राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पोलिसी वापर, गुंड लोकांना राजाश्रय नसावा हे नेत्यांनी लक्षात घ्यावे, एक माणूस क्रांती घडवतो हे लक्षात घ्यावे. सत्ता बदल आवर्जून होतो. शहरातील कायदा सुव्यवस्था कोलमडली असून ते योग्य नाही, भाजपचा कार्यकर्ता कसा असतो ही राजकीय दहशत या ठिकाणी दिसून येत असल्याचं आव्हाडांनी म्हटलं. 

डोंबिवलीकरांच्या सहनशिलतेला माझा मानाचा मुजरालोक मतदान कसं करतात, सुसंस्कृत शहर, विद्येच माहेर घर, स्मार्ट सिटी, सर्वगुणसंपन्न अस हे शहर आहे का? एक रस्ता दाखवा जिथे खड्डा नाही, वाईट जनतेच वाटतं, मत कोणत्या आधारावर देतात, कोणता सोन्याचा पत्रा इथं लावला आहे असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित करत डोंबिवलीकरांच्या सहनशिलतेला माझा मानाचा मुजरा असल्याचं खोचक विधान जितेंद्र आव्हाडांनी केले. 

काय आहे प्रकरण?कल्याण ग्रामीण मतदारसंघात संदप गावात राहणारे प्रल्हाद पाटील यांनी दिवा वसई मार्गावर ट्रेन खाली आत्महत्या केली, त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता, तो व्हिडिओ व्हायरल झाला. व्यवसायात त्यांना काही जणांनी त्रास दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणी भाजप कार्यकर्ते माळी यांच्यासह पंधरा जणांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत माळी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर संदप येथील व्यावसायिक प्रल्हाद म्हात्रे यांच्या आत्महत्या प्रकरणात नाहक भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांना गुंतवलं जात आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दबावतंत्रचे राजकारण केलं जात असून तपास यंत्रणेने निःपक्षपातीपणे चौकशी करावी, त्यापूर्वीच नाहक भाजपच्या पदाधिकाऱ्याला बदनाम करु नका, राष्ट्रवादीची तशी भूमिका सगळ्यांना माहिती आहे अशी टीका कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा