डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट या संस्थेच्या माध्यमातून प्रख्यात डायबेटिशियन डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेल्या बर्ड वॉचर्स ग्रुपने गेल्या दीड वर्षात तब्बल १७० पेक्षा जास्त पक्षी निरीक्षण नोंदवले. त्या अहवालाचे बुधवारी क्लबचे अध्यक्ष विजय डुंबरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
डॉ. पाटील यांनी त्यावेळी दीड वर्षात त्यांच्या समूहाने केलेल्या विशेष पक्षी निरीक्षण याबाबत।माहिती दिली, त्यावरून त्यांचे निरीक्षण खूपच अभ्यासपूर्ण व सखोल असल्याचे उपस्थित जाणकारांना जाणवले. पाटील म्हणाले की, डोंबिवली परिसरात बरेच विदेशातुन येणारे पक्षी सुद्धा आहेत. वेळोवेळी सगळ्यांनी मिळून केलेल्या पक्षी निरिक्षणात आढळलेल्या पक्षांची यादी डॉ. पाटील नेहमी ई-बर्ड या अंतरराष्ट्रीय पोर्टल वर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट या नवाने अपडेट करतात. पक्षी वैज्ञानिक आणि पक्षीशास्त्रज्ञ यांना त्या माहितीची खूप मदत होते. ह्या व्यतिरिक्त हा ग्रुप इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ बर्ड वॉचिंग रोटेरियन्स या अंतराष्ट्रीय संस्थाचे ही संस्था आता सभासदसुद्धा झाली आहे.
सामाजिक उपक्रम म्हणून डॉ.महेश यानी गेल्या वर्षी चिमणी वाचवा हा प्रकल्प केला ज्यात चिमण्यांसाठी त्यानी नारळाच्या शेंडयांनी बनवलेली घरटी वाटप केली, अशी २५० घर त्यांनी अनेकांना दिली. डोंबिवली आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये किती जैव विविधता आहे, किती पक्षी दूर देशातून स्थलांतरित होऊन डोंबिवली पर्यंत येतात हे सगळ्यांपर्यंत पोहोचावे हाच हा फेलोशिप ग्रुपचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून डोंबिवलीची जैव विविधता सुरक्षित राहिल. बुधवारच्या एकत्रिकरणात त्या गटातील सदस्यांना गोंडवीत ह्या पक्षाचे छायाचित्र छापले आहे, अशा (कॅप्स) टोप्यांचे वितरण करण्यात आले. त्या पक्षाचे वैशिष्टय म्हणजे तबल ५ हजार किमी नॉनस्टॉप हा पक्षी हिवाळ्यात फिनलँड वरून भारतात येतात, त्यातही तो पक्षी डोंबिवली मध्येसुद्धा येतो, ही माहिती खूप आनंददायी असल्याचे ते म्हणाले.
ज्या रोटरी सदस्य ना पक्षी निरिक्षण, निसर्गाची आवड आहे ते या ग्रुप मध्ये सहभागी झाले. अवघ्या तीन सदस्यांनी सुरू केलेला हा गृपचे आता तब्बल ८५ सदस्य झाले असून आणखी काहीजण इच्छुक आहेत. डॉ महेश हे पक्षी निरिक्षण गेले ८ वर्षापासून करत आहेत. त्यांनी पक्षी निरिक्षणबद्दल छंद लावला असून बहुतांशी सगळेच रविवारी डोंबिवलीच्या बाहेरील भागात बर्ड वॉचिंग ट्रेल्सला जातात. या ग्रुपचे सदस्य होण्यासाठी... ह्या फेलोशिपमध्ये प्रवेश घेण्यासाठी काहीही शुल्क नसून जे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्वचे सभासद आहेत त्यांना य ग्रुपचे सदस्य होता येते. जे रोटरीचे सभासद आहेत, त्यांचे कुटुंबीय सुद्धा या ग्रुपला जॉईन करू शकतात. पुढील वर्षात या ग्रुपचे बरेच उपक्रम असणार आहेत, ज्यात शाळेतील मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना सामावून घेण्यात येणार आहे. डोंबिवलीची जैव विविधता बदलत चालली आहे त्याबद्दलची वस्तुस्थिती सगळ्याना सांगण्यात येणार आहे.