कल्याण - विरोधकांना काही बोलायचे ते बोलू दया, आम्ही कामातून बोलतो ते जनतेर्पयत पोहोचतय अशा शब्दात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण मैदानावर युवा सेनेचे सहसचिव योगेश निमसे यांनी दोन दिवसीय फुटबॉल स्पर्धा भरवली आहे. त्या स्पर्धेच्या समारोपाला उपस्थित राहीलेल्या शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपण मंजूर करून आणलेला रस्ते विकासाचा निधी रद्द केल्याबाबत नुकतीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विकासाचे मारेकरी अशा शब्दात टिका केली. तर एकनाथ शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे यांनी नवाब मलिकांविषयीची भूमिका स्पष्ट करावी असे मत मांडले होते. यावर रविवारी खा. शिंदे बोलताना म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एमएमआरडीए परिक्षेत्रला मोठा निधी आणण्यात यशस्वी झालो. पूर्ण विभागात रस्ते, फ्लायओव्हरची कामे सुरू आहेत. येणाऱ्या काळात कसा जास्त निधी येईल यावर माझा भर असेल. विरोधकांना काय बोलायचे आहे ते बोलू दया आपण आपल्या कामातून जे बोलतोय ते लोकांर्पयत पोहोचतेय असे शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले प्रत्येक शहरात फुटबॉलचे स्वतंत्र मैदान असले पाहिजे जेणोकरून खेळाडूंना चांगला खेळ खेळता येतील त्यासाठी प्रय} केले जातील आता मातीच्या मैदानावर फुटबॉल खेळला जात आहे. येणा-या काळात टर्फ असेल, तर कुठे आर्टिर्फिशनल तसेच नॅचरल असेल. जिल्हयात फुटबॉल खेळासाठी चांगले इन्फ्रास्ट्रकचर उभे केले जाईल. यावेळी शिंदे यांच्यासह कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक निलेश शिंदे, रवी पाटील, महेश गायकवाड उपस्थित होते.