मोदींवर टीका करताना काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली, नंतर सावरून घेत म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 10:55 PM2022-03-08T22:55:26+5:302022-03-08T22:56:33+5:30
Congress News: भाषणा दरम्यान नेत्यांची अनेकदा बोलतांना जीभ घसरते. अशा घटना वारंवार होता. असा एक प्रकार डोंबिवलीत घडला.
कल्याण - भाषणा दरम्यान नेत्यांची अनेकदा बोलतांना जीभ घसरते. अशा घटना वारंवार होता. असा एक प्रकार डोंबिवलीत घडला. जिथे भाषणादरम्यान काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्या आहे असे भाष्य केले. नंतर त्यांना विचारले असता हा संहारसाठी उतरल्या आहे. लगेच त्यांना त्यांची चूक लक्षात येताच सत्तेच्या संहारासाठी उतरल्या आहेत असे असे सांगून सावरुन घेतले.
आज जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण डोंबिवली शहर महिला काँग्रेस कमिटीतर्फे डोंबिवली ब्लॉक पदाधिकारी सुरेखा ठाकूर यांच्या वतीने महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रदेश महिलाध्यक्ष संध्या सव्वालाखे, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी संतोष केणो, माजी नगरसेवक जितेंद्र भोईर हे उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार भाषण केले. शेतकरी आत्महत्येवर बोलताना संध्या सव्वालाखे यांनी सांगितले की, पुरुष शेतक:यांनी आत्महत्या केली आहे. महिला देखील शेतकरी आहे. महिलांकडून पुरुषांनी शक्ती घेतली पाहिजे. त्यामुळे आत्महत्या थांबणार असे आवाहन केले.
यापुढे बोलताना सव्वालाखे यांनी सांगितेल की, प्रियंका गांधी यांनी लडकी हू लड सकती हू ही मोहिम राबविली जात आहे. प्रियंका गांधी या लढा देण्यासाठी आणि मोदींच्या संहारासाठी मैदानात उतरल्या आहेत असे विधानही त्यांनी केले. मात्र ज्यावेळी माध्यमांनी विचारले की, तुम्ही नरेंद्र मोदी संहारासंदर्भात बोलल्या आहात. त्यावेळी त्यांनी हो असे सांगितले. नंतर मी सत्तेच्या संहारा संदर्भात बोलली असे सांगून बाजू सावरुन घेतली.
दरम्यान डोंबिवलीत भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांच्याकडूनही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. महिलांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी यासाठी मान्यवरांच्या मार्गदर्शन आयोजित करुन जनजागृती करण्यात आली.