शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

आनंद ग्लोबल शाळेत कोण होणार ‘मुख्यमंत्री’..?; १५ ऑगस्टला लागणार निकाल

By सचिन सागरे | Published: August 05, 2023 3:27 PM

निवडणुक रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना चिन्हे देण्यात आली होती. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासून त्यांच्या बोटाला शाई लावत चिन्हासमोरील नावापुढे बटन दाबण्यास सांगितले.

कल्याण - लोकशाहीतून होणाऱ्या निवडणुका शालेय जीवनातच समजाव्यात यासाठी पूर्वेकडील आनंद ग्लोबल शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. २७ उमेदवारांचे भवितव्य सध्या मतपेटीमध्ये बंद असून १५ ऑगस्ट रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नऊ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. शैक्षणिक वर्षामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निर्मिती केली जाते.

निवडणुक रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना चिन्हे देण्यात आली होती. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासून त्यांच्या बोटाला शाई लावत चिन्हासमोरील नावापुढे बटन दाबण्यास सांगितले. २७ उमेदवारांनी आपापल्या परीने पाचवी ते दहावीतील मतदारांना जागरूक राहून मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. भविष्यात मी तुमच्यासाठी काय काय काम करेन? याची आश्वासक यादी विद्यार्थ्यांना सांगितली.

देशातील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका कशा पद्धतीने होतात याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी दरवर्षी असा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्था चालक आशिष पाटील यांनी सांगितले. नऊ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांना ५१५ विद्यार्थ्यांसह २७ शिक्षक तसेच ७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मतदान केल्याची माहिती मुख्याध्यापिका रूपाली पाटील यांनी दिली.

पुढील पदांसाठी घेण्यात आली निवडणूकमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडामंत्री, आरोग्य मंत्री, सांस्कृतिक मंत्री, विज्ञान मंत्री, साहित्य मंत्री व शिस्त मंत्री.